मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आज मंगळवार दिनांक २० मे रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जे प्रभागात सप्तशृंगी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’ या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली.घटनेनंतर तात्काळ केडीएमसी आपत्कालीन पथक, फायर ब्रिगेड, सिव्हिल डिफेन्स आणि टीडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
या दृघटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये
१.प्रमिला साहू २. नमस्वी शेलार. ३. सुनीता साहू ४. सुजाता पाडी ५. सुशीला गुजर ६. व्यंकट चौहान यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये १.विनायक पाडी २. श्राविल शेलार ३. अरुणा गिरनारायण ४.यश क्षीरसागर ५. निखिल खरात ६. श्रद्धा साहू यांचा समावेश आहे.
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला सांगितले. दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला.
महापालिका क्षेत्रात ५१३ इमारती धोकादायक अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. महापालिका परिक्षेत्रात ३० पेक्षा जास्त जुन्या, इमारतीतील इमारत धारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
या वेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायक्त संजय जाधव, अवधूत तावडे, प्रसाद बोरकर, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, तहसीलदार सचिन शेजाळ, माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी/ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
.jpg)







Post a Comment
0 Comments