ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण - डोंबिवली एमआयडीसी रहिवासी क्षेत्रातील एका इमारतीतील बंद असलेल्या फ्लॅट मध्ये घरफोडी केल्याची घटना उजेडात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी , सुदामा नगर मधील मॉडेल कॉलेज बस स्टॉप जवळ असलेल्या साईदीप सोसायटी ( RH-29 ) मधील A आणि B विंग मधील दोन बंद फ्लॅट मध्ये चोरट्यांनी येऊन घरफोडी केली आहे. शुक्रवार 23 मे रोजी दुपारी साडेतीन च्या दरम्यान या घरफोड्या भरदिवसा झाल्याने आणि त्यावेळी एका चोरट्याचा हातात कोयता असल्याचे दिसल्याने नागरिकांत आता घबराट पसरली आहे.
या दोन तरुण चोरट्यांनी A विंग मधील पहिला मजला फ्लॅट क्रमांक 7 ( नाव समजले नाही ) याच्यात घरफोडी करताना ते सीसी कॅमेऱ्यात कैद झाले असून काही मौल्यवान दागिने, ऐवज व रोख रक्कम चोरीस गेली असल्याचे समजले आहे. दुसरी घरफोडी B विंग मधील दुसरा मजला फ्लॅट क्रमांक 10 मध्ये झाली पण या चोरटय़ांना या घरात काही मौल्यवान ऐवज चोरण्यासाठी मिळाला नाही.
या घरफोडीची फिर्याद मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. एमआयडीसी निवासी मध्ये गेल्या दोन महिन्यात अनेक घरफोड्या झाल्या असल्याचे रहिवासी यांचा आरोप असून पोलिसांना या अज्ञात चोरट्यांना शोध घेत आहेत.
.jpg)



Post a Comment
0 Comments