ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी
कल्याणात प्रथमच एक आगळ्या वेगळ्या फार्मसी स्टोअर्सची सुरुवात झाली आहे.नियो आरोग्यम ह्या फार्मसी स्टोअर मध्ये देशातील सर्व प्रकारची औषधे आणि इतर सौंदर्य साधने उपलब्ध करून दिली जात आहेत.हे नुसतेच औषधे विक्री केंद्र नसून येथे औषधांबद्दल पूर्ण माहिती आणि समुपदेशन देण्यासाठी डॉक्टरांची तसेच तज्ञ समुदेशकाची उपस्थिती असणार आहे.त्यासाठी अमेय मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड देऊन,ग्राहकांना औषध देतांना त्याच्या विषयी हवी ती माहिती दिली जाणार आहे.ग्राहकांना कोणत्याही प्रकारे चुकीचे औषध दिले जाऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून, डॉक्टर इन फार्मसी ही कल्पना संपूर्ण भारतात पहिल्यांदाच राबवली जात आहे.हे फार्मसी स्टोअर चोवीस तास सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियो आरोग्यम फार्मसीची अभिनव कल्पना ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केली गेली आहे.ह्या प्रसंगी बोलताना श्री. जगन्नाथ शिंदे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत भर अशा नियो आरोग्यम फार्मसी ठिकठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत.मेडिसिन प्लस मोअर असे घोषवाक्य घेऊन रुग्णांना योग्य दरात,दर्जेदार आणि चांगली औषधे मिळावी यासाठी ह्या कल्पनेचे रूपांतर प्रत्यक्षात आणले गेले आहे.
ह्या फार्मसी शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी शहरातील सर्व थरातील जसे की राजकीय,सामाजिक,शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामांकित मंडळी हजर होती.शेकडो प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नियो आरोग्यम फार्मसी शॉपीचे ग्रँड ओपनिंग झाले.
.jpg)






Post a Comment
0 Comments