Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अधिवक्ता परिषद, कल्याण तालुक्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

अधिवक्ता परिषद, कल्याण तालुक्याच्या वतीने पेहलगाम, जम्मू-कश्मीर येथे भारतीय नागरिकांवर दहशतवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या भ्याड व अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी अधिवक्ता परिषद, कल्याण तालुका संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशतवादाचा जाहीर निषेध केला. या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना अधिवक्ता परिषद, कल्याण तालुका संघटनेने केंद्र व जम्मू-कश्मीर प्रशासनाकडे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत व न्याय देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली. तसेच या बाबत मागणी पत्र कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष अॅड. प्रल्हाद भिलारे, तालुका पालक अॅड. सतीश अत्रे, जिल्हा सहसचिव अॅड. अर्चना सबणीस, वरिष्ठ अधिवक्ता के. टी. जैन, कोकण प्रांत सचिव अॅड. रेखा कांबळे, महामंत्री अॅड. पुजा भालेराव, सचिव अॅड. नरेंद्र बोन्द्रे, उपाध्यक्ष अॅड. नागेश कांबळे, ऍड क्रांती रोठे, व्यवस्थापन प्रमुख अॅड राजु राम, अॅड हेमंत चव्हाण, अॅड. आशीष सोनी, अॅड. तृप्ती बोंद्रे, अॅड शिल्पा राम, अॅड आनंद पवार, अॅड. सुप्रिया नाईक, अॅड. रोनक कारीरा, प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments