आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशनचा
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरीकांमध्ये
संतापाची लाट
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग -६१ कल्याण -माळशेज घाट- आळेफाटा रस्तावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला, भिमाशंकर देवस्थान तसेच या रस्त्याने जाणार्या गावाकडे जाणार्या रस्त्याची बकाल अवस्था झाल्यामुळे नागरीक तीव्र सतंपा व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीं नुसार आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने ठाणे बांधकाम विभाग, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व संबंधितांना निवेदन देण्यात आले असून लवकरच त्वरित कार्यवाही न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिन रोजी आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कल्याण -माळशेजघाट रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आम्ही नगरकर मुंबई संघचे अध्यक्ष मंगेश शेळके, कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर यांच्या वतीने निवेदन देऊन माहिती देण्यात आली.
.jpg)


Post a Comment
0 Comments