ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दिनांक 29.03.25 रोजी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित 'संवेदन'2024/25, अंतर्गत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून इ.१०वी च्या विद्यार्थ्याना भविष्यातील करिअर निवडी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांच्या सहाय्याने समुपदेशन सत्र यशस्वीरित्या संपन्न झाले .कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरम् व दीप प्रज्वलनाने झाली. सदर कार्यक्रमचे उद्घाटन छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री. श्रीकांतजी तरटे , शिक्षक समुपदेशक श्री संजय जाधव व श्री सदानंद जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शिक्षण मंडळाच्या NEP समन्वयक माननीय सौ.उर्मिला जाधव मॅडम यांनी केले. माननीय श्री तरटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपला कल व क्षमतानुरूप भविष्यातील अभ्यासक्रम कसा निवडावा या संदर्भातील मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
सदर कार्यक्रमास छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेतील व इतर शाळांमधील एकूण 34 विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. शिक्षक समुपदेशक श्री संजय जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्या दिल्या, तर शिक्षक समुपदेशक श्री सदानंद जाधव सर यांनी शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना कसे जाणून घ्यावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुरूप, क्षमतेनुरूप योग्य करिअर निवडी संदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन शिक्षक समुपदेशकांनी केले.
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संस्थेचे सरचिटणीस मा. डॉ. निलेशजी रेवगडे ,संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री . श्रीकांतजी तरटे व संस्था NEP समन्वयक सौ उर्मिला जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाहिरा तडवी यांनी केले. व कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण "संवेदन" टीमने केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments