ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
मुंबई, गिरगांव आणि आसपासच्या परिसराचा विकास होत असताना कुंभारवाडा दुर्लक्षित का असा प्रश्न स्थानिकाना पडलेला होता परंतु हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात भाजपचे आमदार श्री प्रवीण दरेकर साहेबांनी गिरगांव आणि आसपासचा परिसर येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुन:र्वसन संदर्भात लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करून येथील रहिवाश्यांच्या आणि इमारती मालकांच्या व्यथा सभागृहात मांडल्या आणि त्यावर महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्याची दखल घेऊन अश्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावून म्हाडा, एमएमआरडी आणि राज्यशासना मार्फत सामूहिक पुन:र्विकास करण्याचे सभागृहाला आश्वासन दिले.
त्यानुसार मागील कित्येक वर्षांपासुन कुंभारवाडा विभागाच्या पुनर्विकासावर काम करणारे बुटावाला ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक झोएब बुटावाला त्यांनी त्यांच्याकडील विकास आराखडा आणि माहिती घेऊन भारतीय जनता पार्टी, मुंबई म्हाडा सेलचे अध्यक्ष श्री मिलिंद तुळस्कर, श्री सुधीर चिंबुळकर यांसह कुंभारवाड्यातील स्थानिकाच्या गाठीभेटी घेऊन शासना मार्फत एक ते सहा कुंभारवाड्याच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली. त्यांस स्थानिकांनीसुद्धा योग्य प्रतिसाद देऊन एक पंधरा सदस्यांची कमिटी स्थापन केली असून लवकरच स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन पुनर्विकासा संदर्भात माहिती देण्यात येईल आणि आपल्या कुंभारवाड्याचा सामूहिक विकास कसा करता येईल असे आमच्या प्रतिनिधिशी माहिती देताना सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments