Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू

  मुस्लीम आहात का?आधी विचारलं मग बेछूट गोळीबार 

                  ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा 

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेनं परिरसरासह पुर्ण देशात खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक जखमी देखील झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना 'तुम्ही मुस्लिम आहात का?' असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.


दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी अमित शहांशी फोनवरून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. जखमीमध्ये पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच जखमीमध्ये 2 जण महाराष्ट्रातील पर्यटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुंबईतील डोंबिवलीमधील तीन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत. तर जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्यात येत आहे. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे ही माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. ते सतत सरकारच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत.

अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

अतुल मोने हे रेल्वेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर - 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.

जखमी झालेल्या पर्यटकांची नावे

विनोद भट - (गुजरात)

मनिक पाटील

रिनो पांडे

एस बालचंद्रू - (महाराष्ट्र)

डॉ. परमेश्वर

अभिजावन राव कर्नाटक

संत्रू - तामिळनाडू

शशी कुमारी - ओरिसा.

असावरी जगदाळे - महाराष्ट्र

प्रगती जगदाळे - महाराष्ट्र

संतोष जगदाळे - महाराष्ट्र

कौस्तुभ गनबोटे - महाराष्ट्र

संगीता गनबोटे - पुणे


Post a Comment

0 Comments