ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गोल्फ लिंक्स फेडरेशन, कासा बेला गोल्ड आणि कासा बेला फेडरेशन यांच्या वतीने रामा नवमी निमित्त पलावा येथे भव्य रथयात्रा आणि पालखी यात्रा काढली होती. या यात्रेला पलावा तील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या यात्रेचे मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. राजू पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील यांनी पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले. तसेच डोंबिवली भाजपाचे आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही आपल्या परिवारासह पालखीचे दर्शन घेतले. या यात्रेमध्ये सामाजिक कार्यकर्ते चेतन तायशेट्ये आणि मनसेचे पदाधिकारी योगेश पाटील यांची उपस्थिती होती.
.jpg)


Post a Comment
0 Comments