ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागासाठी फिरते पोलीस स्टेशन (डिजीटल व्हॅन) हा अभिनव व अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. टिटवाळा येथे देखील या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, आश्रम शाळा, कॉलेज, गुरवली (आदिवासी वाडी), मांडा टिटवाळा, वासूंद्री, गणपती मंदिर (टिटवाळा) व निमकर नाका अशा ठिकाणी भेट घेऊन त्यांना फिरते डिजिटल व्हॅन पोलीस स्टेशन तयार केले आहे तसेच डिजिटल व्हॅन बाबत मार्गदर्शन देण्यात आले.
या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या मुख्य उदेश म्हणजे पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करणे व नागरीकांमध्ये कायदयाची जागरुकता वाढविणे, तसेच थेट जनते पर्यंत पोहचून त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे त्वरीत निराकरण करणे हा होय. तसेच या अभिनव कार्यक्रमांद्वावरे उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरीकांशी थेट संवाद साधत आहेत.
नवीन कायदयाची माहिती, सुरक्षा बाबत मार्गदर्शन तसेच जनजागृतीसाठी विविध माहिती पथ चित्रफिथ दाखविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या कार्याक्रमांत नागरीकांच्या तक्रारी त्याच्या घरी जाऊन ऐकल्या जात आहेत. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या जात आहेत. पोलीसांविषयी अधिक विश्वास वाढला असुन कल्याण ग्रामीण भागातील नागरीकांनी या उपक्रमांचे कौतुक करत, स्वागत केले आहे.
या फिरते डिजिटल पोलिस स्टेशन गाडी मधून साखळी चोरी, बाळ लेंगिक शोषण, सोशल मिडीयाचा वापर कसा करायचा, जर कोणी मुलीची छेड काढली तर तिला मदत कशी करायची, ट्रॅफिक नियमाचे पालन कसे करायचे, आदिवासी पाडे, विट भट्टीवर काम करणाऱ्या मजूरांची भेट घेऊन त्यांना काही त्रास आहे काय ? आणि असेल तर डिजिटल व्हॅन अंतर्गत त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून तिचे तात्काळ निरसन करणे असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
हा उल्लेखनीय उपक्रम कल्याण ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये विश्वास निर्माण करणारा आणि पोलीस व जनते मधील संबंध अधिक बळकट करणारा ठरत आहे. कल्याण तालुक्यातील नागरीकांनीही या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले असून त्यांचे प्रतिक्रीया अंत्यत सकारत्मक ऐकायला मिळत आहेत. पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण डॉ. डी. स्वामी यांनी डिजीटल फिरते पोलिस ठाण्याच्या गाडीतील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी बद्दल आनंद व्यक्त केलेला आहे.
.jpg)





Post a Comment
0 Comments