Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सोशल मिडीयावर तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची बदनामी तरुणीने मागितली पोलिस प्रशासनाकडे मदत..

 

तरुणीने मागितली पोलिस प्रशासनाकडे मदत..

                ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर प्रतिनिधी 

बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ ह्या संकल्पने च्या काळात बेटी किती असुरक्षित आहे, ह्याचे उदाहरण पहायला मिळाले आहे.ठरलेले लग्न मोडले व सोशल मिडीयावर  घरच्यांची अश्लिल बदनामी करून आत्महत्येची वेळ आणली असल्याने कायदेशिर कारवाई करून न्याय मिळावा या बाबत पोलिस प्रशासनास उल्हासनगरची रहिवाशी कन्या कु. पुनम राजु वाघरी यानी उल्हासनगर व गुजरात येथील रहिवाशी स झंजवाड़िया परिवार यांचे विरोधात अर्ज़ केला आहे,

मिळालेल्या माहिती प्रमाणे, मोठ्या बहिणीच्या सासरची मंडळीनी बहिणीचा मानसिक व शारीरीक छळ करून तीचे वैवाहीक जीवन उध्वस्त केल्यामुळे आम्ही झंजवाडिया यांच्या परिवार विरोधात कौटूंबिक हिंसाचाराची केस उल्हासनगर कोर्टात दाखल केली आहे. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी गुजरात व उल्हासनगर येथील आमच्या समाजात आमची बदनामी करीत असल्याने आमचे जगणे मुश्किल झाले आहे.

तरी पोलिस प्रशासनाने यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आमची होत असलेली बदनामी थांबवावी अशी विनंती कु. पुनम राजू वाघरी ह्या मुलीने पोलिस प्रशासनास अर्ज केला आहे.

Post a Comment

0 Comments