बैलांवर मन हेलवण्याऱ्या घटनेच चित्र
रेखाटत, केला भ्याड हल्ल्याचा निषेध
पाकिस्तान विरोधात बैलगाडा
चालकांच्या घोषणा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीत बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली आहे. काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या नक्षलवादी हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली - बदलापूर पाईप लाईन मार्गावर अखिल भारतीय बैलगाडा संघटना उतरली रस्त्यावर उतरली असून यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाडा मालकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बैलगाडा मालकांनी जनावरांवर मन हेलवण्याऱ्या घटनेच चित्र रेखाटत या हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान निषेध करण्यासाठी ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून बैलगाडा मालक आले असल्याची माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments