नवीन चार स्थानकांची निर्मिती होण्याची शक्यता
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.

नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच नाशिक आणि मुंबई ही दोन शहरे लोकल सेवेने जोडली जाणार आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.

नाशिक ते मुंबई दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढवला जाईल. त्यामुळे वेगाने प्रवास होणार आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

नवीन मार्गावर काही नवीन स्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात न्यू नाशिक रोड, न्यू पाडळी, वैतरणानगर, चिंचलखैरे या चार नवीन स्थानकांचा समावेश आहे. नाशिक रोडवरुन नाशिक शहरात जाण्यासाठी न्यू नाशिक रोड असे दुसरे स्थानक असणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments