Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा 134 वा वर्धापन दिन दिमाखात संपन्न

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ,दादर. या संस्थेचा 134 वा वर्धापन दिन दादर येथे संस्थेच्या अक्षीकर  सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी न्याय व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे , अपेक्षित समाजाची सेवा करून माणसातलं देवपण जपणारे आणि भटक्या, विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, त्यांचे दीपस्तंभ, विद्यावाचस्पती व युनेस्को द्वारे सन्मानित करण्यात आलेले श्री उमाकांत मिटकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील, उपेक्षितांशी जुळवून घेतानाचे चित्त थरार अनुभव या प्रसंगी कथन करून, पालावरची शाळा ही संकल्पना विस्तृतपणे मांडली .संस्थेचे अध्यक्ष मा श्री डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांनी संस्थेच्या कारभाराविषयी कौतुक करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी दशसूत्री दिली .तर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शैलेंद्र साळवी यांनी  संस्थेची  विविध क्षेत्रात करत असलेली प्रगती  व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून संस्थेच्या कार्याचा अहवालच उपस्थितापुढे सादर केला. संस्थेचे कार्यवाह श्री विकास पाटील यांनी संस्था करत असलेल्या वेगवेगळ्या कार्याची माहिती विशद करून संस्थेच्या प्रवाहात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मयोगाने महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "अक्षीयन" या ई मासिकाचे प्रकाशन करण्यात आले .तसेच संस्थेच्या विविध कार्यक्रमांची माहिती सर्वदूर व्हावी   या साठी  सामाजिक प्रसार माध्यमांच्या  ॲप्स चे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या  हस्ते करण्यात आले.जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेचा 1889  ते 2025 च्या प्रवासाची माहिती, डॉक्युमेंटरी स्वरूपात यावेळी प्रदर्शित करण्यात आली.यासाठी संस्थेचे कार्यवाह श्री विकास पाटील ,संचालक मंडळ सदस्या सौ स्नेहा शेडगे, शिक्षक श्री देवेंद्र पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले .

 कार्यक्रमाची सुरुवात आराध्याच्या अभंगांनी होऊन छबीलदास इंग्रजी माध्यमाच्या मुलींनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने झाली. संस्थेतील गुणी, कार्यक्षम शिक्षक शिक्षकेतेरांचा सन्मान व निवृत्त शिक्षक शिक्षकेतरांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सई पटवर्धन ,श्री देवेंद्र पाटील ,सौ समृद्धी जगताप श्री फरडे सर व सौ अर्चना इशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपकार्य श्री महेश केळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ..... हिच्या  सुश्राव्य  पसायदानाने झाली .

याप्रसंगी संस्थेचे  उपाध्यक्ष श्री मिलिंद कुलकर्णी, उप कार्याध्यक्ष श्री प्रदीप राका,कोषाध्यक्ष श्री रवींद्र तामरस,संचालक मंडळ सदस्य श्री राजेंद्र राजपूत तसेच सर्व संचालक मंडळ ,सर्व शाळांचे  मुख्याध्यापक ,निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,आदर्श  पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  वृंद व संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments