Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक पेपर तपासणीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नवी मुंबई वाशी व ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात जाऊन अध्यक्ष आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांना अंशता: अनुदानित शाळांना 14 ऑक्टोबर 2024 रोजीचा शासन निर्णय काढून सुद्धा आर्थिक अधिवेशन 2025 मध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद पुरवणी मागणी मध्ये करण्यात आलेली नसल्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या वतीने पेपर तपासणीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यासंदर्भाचे पत्रक निवेदनाद्वारे दिले.तरी शिक्षण सचिव, शिक्षण मंत्रीअर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना शिक्षकांच्या भावना पोहचविण्याची मागणी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाकडे करण्यात आली आहे.


 यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल पाटीलठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गणेश पाटील, सचिव प्रवीण लोंढे, ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटना उपाध्यक्ष प्रकाश मगर आदी जण उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments