Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सुनील म्हसकर यांच्या रिसर्च पेपरचे राष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट सादरीकरण...

                  ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड वार्ताहर

सुनील म्हसकर यांच्या रिसर्च पेपरचे राष्ट्रीय चर्चासत्रात  सादरीकरणशिक्षण मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड. कॉलेज, संलग्न - मुंबई विद्यापीठ) शिवळे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे 'महिला सक्षमीकरण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य' या विषयावर एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार सन्माननीय गोटीरामभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. सुनीता मगरे, जनसेवा शिक्षण मंडळाचे सहसचिव भास्कर हरड, तज्ञ मार्गदर्शक व परीक्षक डॉ.मीना कुटे, डॉ.भाऊसाहेब आंधळे, आदी मान्यवर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.बडगुजर, प्राचार्य डॉ.के.सी.राठोड, प्रा.अर्चना भालेवार, प्रा.बी.एच.विशे प्रा.डॉ.शैलेश  डोंगरे, संशोधन अभ्यासक, आणि बीएडचे सर्व शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. 

या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत अनेक संशोधकांनी आपली संशोधने सादर केली. यामध्ये संशोधन अभ्यासक सुनील म्हसकर यांचा 'महिला शिक्षकांमधील महिला सक्षमीकरणाचा अभ्यास' या विषयावरील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केलेला रिसर्च पेपर सर्वात उत्कृष्ट ठरल्याबाबत डॉ. सुनीता मगरे यांनी सुनील म्हसकर यांचे  विशेष कौतुक व अभिनंदन केले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते सुनील म्हसकर यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

या रिसर्च पेपरसाठी सुनील म्हसकर यांना मार्गदर्शक प्रा.डॉ.हिना वाधवानी आणि डॉ.भक्ती सिंघानिया (सहयोगी प्राध्यापक, सेवा सदन शिक्षण शास्त्र महाविद्यालय, उल्हासनगर) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

संशोधन अभ्यासक सुनील म्हसकर हे सध्या मुंबई विद्यापीठातून 'शिक्षणशास्त्र' या विषयात पीएचडी करत आहेत. तसेच ते शेतकरी उन्नती मंडळाच्या सिताराम रामा पाटील विद्यालय आणि रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे, तालुका भिवंडी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

सुनील म्हसकर यांनी  या आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर  व राष्ट्रीय पातळीवर रिसर्च पेपर उत्तम प्रकारे सादर केले आहेत. तसेच त्यांनी आजतागायत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, व वेबिनार यामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.

संशोधन अभ्यासक सुनील म्हसकर यांनी  संशोधन कार्यातील केलेल्या या कौतुकास्पद व अभिमानास्पद कामगिरीबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments