Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाकुर्ली रेतीबंदर परिसरात अवैध रेती साठवणूक प्रकरणी कारवाई

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

अवैध रित्या रेती उपसा अवैध रित्या साठवणूक प्रकरणी कल्याण तहसीलदार यांनी धडक कारवाईचा बडगा उगरला आहे. दोन दिवसा पूर्वी उंबर्डे परिसरात 5 सक्शन पंप, 4 बार्ज  अवैध रित्या रेती उपसा प्रकरणी कल्याण तहसीलदार पथकाने कारवाई दरम्यान रेती उपसा सामुग्री जाळीत अवजड बार्जला जल समाधी दिली होती. बुधवारी  कल्याणचे  तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या  सोबत ठाकुर्ली मंडळअधिकारी व त्यांचे अधिनस्त ग्राममहसूल अधिकारी यांच्यासमवेत ठाकुर्ली रेतीबंदर येथील रेती साठवणूक करणाऱ्या एकूण ८ कुंड्यांवर कारवाई करून नष्ट करण्यात आल्या.  खाडी किनारी साठवण्यात आलेला रेतीसाठा जे सी बी मशीनच्या सहायाने खाडीपात्रात ढकलून नष्ट करण्यात आला आहे.




या कारवाई दरम्यान रेतीमाफीया यांचे एकूण अंदाजे रक्कम रुपये ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या कारवाई बडग्यामुळे अवैध रित्या रेती साठवणूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.






Post a Comment

0 Comments