Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये निघाला भव्य मोर्चा

 

बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये निघाला भव्य मोर्चा  

 ब्राह्मणी कर्मकांडापासून बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी


              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 


बुद्धगया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन व सर्व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज कल्याणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.

 

यावेळी बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरोभंते प्रियरत्न थेरोभंते शक्यरत्न थेरोभंते तुशीतरत्न थेरो,भंते विनयरत्न,भंते इंद्ररत्नभंते यामरत्न,भंते नंदरत्न,भंते शिलरत्न यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चाला सुरवात करण्यात आली. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसदिलदार कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


या आंदोलनास बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण पूर्वडॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याण पूर्वभारतीय बौद्ध महासभा कल्याणबौद्ध विहार संघटना समन्वय समितीवंचित बहुजन आघाडीरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाबहुजन समाज पार्टीआझाद समाज पार्टी (भीम आर्मी) दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कल्याण सिटी  संघटनांनी याआंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून ठाणे जिल्हा सह मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 




यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती ठाणे जिल्हा सर्वासर्वेबुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी राज्य सरकार व  केंद्र सरकार कडे मागणी केली आहेकी बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे. बुद्धगया टेम्पल ॲक्ट कलम १९४९ रद्द करावेब्राह्मणी पंडे पुरोहिताच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी. महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पाडले जावेत या मागण्या करण्यात आल्या.

 


Post a Comment

0 Comments