Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हासनगर महापालिके द्वारे वालधूनी नदी संवर्धन अभियान सुरु

 

             ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर प्रतिनिधी 

श्रीमती मनीषा आव्हाळे प्रशासक तथा आयुक्त  उल्हासनगर महानगर पालिका यांच्या  संकल्पनेतून  25 मार्च रोजी सकाळी हॉटेल प्रवीण, खन्ना कंपाऊंड ब्रिज येथे  वालधूनी नदी संवर्धन समितीचे पदाधिकारी व विविध सेवाभावी संस्था  व स्थानिक प्रभागाचे नगरसेविका माजी महापौर  श्रीमती. राजेश्री चौधरी यांच्या संयुक्त विद्यामानाने नदी संवर्धन अभियान  आयोजित करण्यात आले.

सदर अभियानात  वालधुनी नदीचा परिसर स्वच्छ ठेवणे, आपला घरातून, दुकान ,कारखान्यातून  रोजच निघणाऱ्या कचराचे वर्गीकृत करून महापालिकेस दयावा. निर्माल्य/कचरा नदीत टाकू नये म्हणून जाळी लावणे, जनजागृतीचे फलक लावणे, ब्रिजची सफाई व स्वच्छता करून झाडाच्या  कुंड्या ठेवणे, शुन्य कचरा संकल्पनाची अंमलबजावणी करणे  आदी  कार्यक्रम हाती घेऊन जनजागृती करण्यात  आली,

प्रभाग क्रमांक 10 मध्ये येत असलेल्या वालधुनी नदीच्या 4 पुलावर जाळी बसवयाची सुरुवात झाली,ह्या प्रसंगी उमनपा अधिकारी विनोद केणे, एकनाथ पवार, रविन्द्र बेहेनवाल, वृक्ष फाउंडेशनच्या ज्योती तायड़े, वालधुनी नदी संवर्धन समिती चे शशिकान्त दायमा सहित  शहरातील व स्थानिक नागरिक, विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्था, समाज सेवक, व्यापारी संघटना, स्वच्छता दूत यांनी सहभाग घेऊन शहर  स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वचनबद्ध राहून उपस्थित राहिले.

Post a Comment

0 Comments