ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी
गुरुवार दि.30/01/2025 रोजी पी. एन .घुडे विद्यालय भादाणे विद्यालयाचा वार्षिक पारितोषक वितरण व इयत्ता 10वी निरोप समारंभ संपन्न झाला . या निरोप समारंभासाठी विद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष मधुकर (आप्पा) घुडे , शिवसेना भिवंडी लोकसभेचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे , शिवसेना भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख व दानशूर समाजसेवक सोन्या पाटील , श्री पितांबरे , जागृती मित्र मंडळ संस्थेच्या सरचिटणीस सौ. वनिताताई मधुकर घुडे,ग्रा.प. भादाणे सरपंच .सौ. मनस्वी महेश हंडोरे, ग्रा. पं. सरपंच खांडपे .सौ. अक्षता मदन वाघचौडे, तसेच भादाणे, बोरगाव, खांडपे व परिसरातील पालक वर्ग ,ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत गोडांबे , शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख साईनाथ तारे साहेब यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.तसेच अध्यक्षीय संदेशांमध्ये विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घुडे यांनी उपस्थितांबरोबर संवाद साधून मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ निमित्ताने विद्यालयास वस्तू रूपाने भेट दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक रावसाहेब खेडकर यांनी केले. आभार प्रदर्शन मा. राजेंद्र देशमुख यांनी केले.
Post a Comment
0 Comments