ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुंडागिरीला चांगलाच चाप बसवित पायबंद घातला होता. गुंडागिरी करणार्याना जेरबंद करीत आपल्या कामाची दशहत गुडांना मध्ये निर्माण केली होती. परंतु अचानक त्यांच्या बदली सत्राने नागरिकामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्तव्य दक्ष कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची 3 फेब्रुवारी रोजी पोलिस आयुक्त आशुतोष डुबरे कंट्रोल रूममध्ये बदली केली. कदमांच्या बदलीची बातमी ऐकून कल्याणकर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंगळवारी रोजी दुपारी, आरटीआय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांच्यासमवेत कल्याण पूर्वेतील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचत उपायुक्त अतुल झेंडे यांना भेटले आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कदम यांच्या बदलीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी म्हणाले की कोळसेवाडीचे पोलिस स्टेशनचे वपोनि अशोक कदम हे त्यांच्या कर्तव्यावर निष्ठावान होते. त्यांनी कल्याण पूर्वेत एक चांगले काम केले. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रित करीत आणि गुंडागिरीवर अंकुश आणला. अशा निष्ठावान अधिकाऱ्यांची बदली होते. ती बदली थांबिवली पाहिजे, यासाठी शिष्टमंडळाने आज पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तुमच्या सर्व भावना वरिष्ठ अधिकार्यापर्यंत पोचवल्या जातील असे आश्वासन दिले. तर सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांचे म्हणणे आहे की, दोन दिवसांत बदली रद्द बाबत न कळल्यास या संदर्भात कल्याणकरांचे शिष्टमंडळ ठाणे पोलिस आयुक्तांना भेटून आणि केलेली बदली रद्द करण्याची मागणी करणार आहोत.
Post a Comment
0 Comments