गायकवाड यांनी लोकांच्या समस्या
ऐकून घेत समस्यांचे केले निराकरण
तर उर्वरित समस्या सोडवण्यासाठी
पाठपुरावा करणार करणार असल्याचे
दिले आश्वासन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथे रविवारी भाजपा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबारात आपले गार्हाणे मांडण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. भाजपच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जनता दरबारात ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असून छोट्या, स्वरूपाच्या समस्यांसाठी त्यांनी तत्काळ अधिकार्यांशी फोनवरून संपर्क साधून त्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना संदर्भीत आधिकार्याना दिल्या.
जनता दरबारमध्ये मतदारसंघातील स्त्रियांपासून अबाल वृद्ध मंडळी आपल्या समस्या घेऊन आमदार सुलभा गायकवाड यांना त्या सोडवण्यासाठी गार्हाणे सांगितले. गायकवाड यांनी त्यांच्या समस्या ऐकून शक्य तितक्या लवकर निवारण करण्याचे आश्वासन यानिमित्ताने दिले. संभाषणादरम्यान आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या की, जनता दरबार विशेषत: मतदारसंघातील नागरिकांसाठी ठेवण्यात आला आहे, जो माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकाळापासून सुरू आहे.
जनता दरबारासाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबारमध्ये हजेरी लावली आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या समोर आपल्या समस्याची कैफियत मांडली. गायकवाड यांनी अधिकारी वर्गाशी संपर्क साधत काही समस्या मार्गी लावल्या तर काही मोठ्या समस्या बाबत आपण पाठपुरावा करून निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
Post a Comment
0 Comments