ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( शंकर जाधव )
नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे १३-१५ फेब्रुवारी रोजी १९ वी कनिष्ठ व वरिष्ठ आणि ४ थी अखिल भारतीय उडी दोरी स्पर्धा २०२४-२५ पार पडली. यामध्ये वेग, सहनशक्ती आणि अचूकतेचा उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळाला. या स्पर्धेत वनीश्री सौरभ जोशी हिने आपली चमकदार कामगिरी सिद्ध करत २१ वी कनिष्ठ व वरिष्ठ दोरी उडी राष्ट्रीय स्पर्धा आणि ४ थी अखिल भारतीय उडी दोरी स्पर्धा २०२४-२५ मध्ये २ रौप्यपदके (सिल्व्हर मेडल्स) पटकावली. डोंबिवलीतील वनीश्रीने उत्कृष्ट खेळामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
तिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा जोडत, वनीश्रीने १६ वी वरिष्ठ व बालगट दोरी उडी महाराष्ट्र राज्य स्पर्धा २०२४-२५ (उलवे, रायगड) येथे देखील २ रौप्यपदके जिंकत आपले कौशल्य सिद्ध केले.वनीश्रीच्या कठोर मेहनतीचे, समर्पणाचे आणि जिद्दीचे हे फळ आहे. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. वनश्रीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments