हॉटेल-बार मालक आणि लॉज मालकांना कडक इशारा
पडताळणीत बांग्लादेशी आढळल्यास मालकांवर होणार कारवाई
नोटीस पाठवून लवकरच पडताळणी साठी सूचना
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पोलिस बांग्लादेशी घुसखोरांविरूद्ध अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हॉटेल-बार मालक आणि लॉज ऑपरेटरला पोलिसांनी यासंदर्भात कठोर इशारा दिला आहे. तसेच, प्रत्येक व्यवसाय आस्थापनाला असा इशारा देण्यात आला आहे की जर पडताळणीत बांग्लादेशी आढळल्यास आस्थापना मालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परिमंडळ 3 च्या सर्व पोलिस स्टेशन भागात हॉटेल-बार मालक आणि लॉज ऑपरेटरला नोटीस पाठवून कठोर इशारा देण्यात आला आहे. तसेच कामगार आणि कर्मचार्यांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी कल्याण तहसीलमध्ये 1250 बांगलादेशी लोकांच्या घुसखोरीचा दावा केला. सोमैयाच्या या दाव्यानंतर कल्याणमध्ये खूप खळबळ उडाली.
सोमैयाच्या दाव्यानंतर पोलिस कारवाईत आले आहेत आणि त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीत चौकशी सुरू केली आहे. भारतात राहणार्या बेकायदेशीर बांग्लादेशीच्या शोध मोहीमेसाठी हॉटेल व्यापारी, बार एंड रेस्टॉरंट्स, लॉजिंग बोर्डिंग, कामगार कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांना कल्याण डोंबिवली हद्दीतील पोलिस स्टेशन मध्ये संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे पडताळणी पत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्या बाबतची माहिती पोलिस स्टेशन माहिती शक्य तितक्या लवकर द्यायची आहे. त्याच वेळी, त्यांना असा इशारा देण्यात आला आहे की जर बांग्लादेशी मजूर संबंधित ठिकाणी आढळले तर माहिती लपविण्या प्रकरणी मालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
Post a Comment
0 Comments