Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंमली पदार्थ विशेष पथकाची कारवाई

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण परीमंडळ ३ मध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असताना मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोरसावित्रीबाई फुले नाटयगृह येथे एक इसम सनिल श्रीनाथ यादववय २५ वर्ष हा त्याच्या  ताब्यात एकुण ८.४८ ग्रॅम वजनाचा १६ हजार ५०० रूपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगलेला मिळुन आल्याने त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत दुर्गामाता चौक येथील मोकळया जागेत शंकर महादेव गिरीवय ४६ वर्षेहा त्याच्या  ताब्यात एकुण ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा १ लाख रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी  जवळ बाळगलेला मिळुन आल्याने त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 डोंबिवली पोलीस स्टेशन हददीत राजाजी पथस्वामी नारायण मंदिरा बाजुस असलेल्या मोकळया जागेत  सचिन कावळेवय ३२ वर्षे अमन गुप्ता उर्फ पप्पुवय १६ वर्षेयांनी मिळुन त्यांच्या  ताब्यात एकुण २३.५३ ग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ व १० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकुण ९३ हजार ९४३ रूपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्रीसाठी  सोबत बाळगल्याने  त्यांच्यावर  डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तसेच परिमंडळ ३ कल्याण मध्ये १ जानेवारी ते आजपर्यंत  विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकुण १३ गुन्हे दाखल असुन या  गुन्हयात १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन ६३ ग्रॅम एम. डी. पावडर२३२ कोडीनयुक्त बॉटल व नशेच्या गोळ्या तसेच ४७ किलो ४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १२ लाखापेक्षा जास्त रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे.


 

हि कारवाई पोलीस उपायुक्त  अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रशांत चव्हाणपोना शांताराम कसबेपोशि गौतम जाधव, राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाणेचे वपोनि जावदवाडसपोनि कोकरेमानपाडा पो. स्टे.चे पोनि  गुंडसपोनि  राळेभात व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोनि  दुकलेसपोनि राठोड यांच्याकडुन कामगिरी करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments