शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाने घेतली प्रांत अधिकाऱ्यांकडे
मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींच्या तोडक कारवाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आक्रमकपणा कायम असून या रेरा घोटाळ्याप्रकरणी खोटे कागदपत्र पुरविणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली आणि तातडीने न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. या भेटीदरम्यान शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, प्रमोद कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळीफसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई कराया प्रकरणात खोटे कागदपत्रे, सातबारे तयार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत. या अनधिकृत इमारती उभारणीस जबाबदार असलेल्या विकासक आणि भूमाफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. फसवणूक झालेल्या नागरिकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी विशेष तपास यंत्रणा स्थापन करण्यात यावी. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून महसूल आणि महानगरपालिका प्रशासनाने ठोस नियोजन करावे व कठोर उपाययोजना राबवाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अन्यायग्रस्त नागरिकांसोबत ठामपणे उभा आहे. जर प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना न्याय दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिला..jpg)

Post a Comment
0 Comments