ठाणे शहरच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार असल्याचे गणेश नाईक यांनी जाहीर केले आहे.
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर घेरण्याची तयारी भाजपने केली आहे.भाजपचे नेते, मंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्याची जबाबदारी दिली आहे. गणेश नाईक यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. आपण ठाणे शहरच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार असल्याचे गणेश नाईक यांनी जाहीर केले आहे.
गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीदेखील आम्ही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ असे जाहीर केले. गणेश नाईक यांना संपर्क मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गणेश नाईक यांची ठाण्यातील एन्ट्री ही एकनाथ शिंदे यांना घेरण्याचे संकेतच असल्याचे म्हटले जात आहे. गणेश नाईक यांना मानणारा मतदार वर्गही ठाण्यात आहे. त्यामुळे नाईकही आक्रमक झाले आहेत.
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. 24 फेब्रुवारीचा जनता दरबार हा ठाणेकरांसाठी असणार आहे. यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरु होण्याची चिन्हं आहेत.
मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी गणेश नाईक यांचा ठाण्यातील जनता दरबार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होते. त्यातच आता 24 फेब्रुवारीला ठाण्यातील जनता दरबार हा सर्व ठाणेकरांसाठी असणार असून त्यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घ्यावा असा आवाहन देखील यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी केले.
गणेश नाईक यांच्या जनता दरबारामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात ठाण्यात कोल्ड वॉर सुरू होणार असल्याच चित्र आहे. गुरुवारी पालघर मध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. यावेळी 700 पेक्षा अधिक अर्ज स्वतः गणेश नाईक यांनी तपासून येत्या पंधरा दिवसाच्या आत हे सर्व निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
Post a Comment
0 Comments