आदिवासी कुटुंबाच्या प्रलंबित मुलभूत
प्रश्नांसाठी श्रमजीवी संघटना आक्रमक
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आदिवासी कुटुंबाच्या प्रलंबित मुलभूत प्रश्नांसाठी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाला आयुक्तांसोबत चर्चा करण्यासाठी आज केडीएमसी आयुक्त कार्यालयामार्फत वेळ देण्यात आली होती. मात्र आज आयुक्त नसल्याने या शिष्टमंडळाला सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच आडवले. आयुक्त आज उपलब्ध नव्हत्या तर तसे आयुक्त कार्यालयाने कळविणे आवश्यक होते असे सांगत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. या आदिवासी बांधवांचे पिण्याचे पाणी, रस्ते, विज, घरपट्टी, घरकुल, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय, शिक्षण, आरोग्य ई. प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. याबाबत आयुक्त कार्यालयाशी अनेक वेळा अर्ज, निवेदन देऊनसुद्धा प्रश्न निकाली निघालेले नाहीत. यामुळे आदिवासी वस्तींचा विकास होऊ शकला नाही. आदिवासी वस्त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत कि ग्रामपंचायतीमध्ये आहेत असा प्रश्न श्रमजीवी संघटनेला पडलेला असून स्वातंत्र्यानंतर देखील अशी अवस्था असल्याने हि खेदाची बाब असून या समस्या लवकरात लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments