दिड लाखांची लाच घेतल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाच्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सांयकाळी पावणेसातच्या सुमारास पालिका मुख्यालया नजीक असलेल्या चहाच्या टपारीवर रंगेहात अटक केली आहे. प्रशांत धिवर असे या अटक केलेल्या केडीएमसी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आरोपी प्रशांत याने तक्रारदाराच्या नावे असलेले मटण विक्री व कटाईचे लायसन हे त्यांचा मित्राच्या नावावर करण्यासाठी या कामाचे पेपर्स स्विकृत करुन काम करुन देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडून दोन लाखाची लाच मागितली होती. तडजोडी अंती स्वत: करीता तसेच त्यांचे वरीष्ठ अधिकारी एएमसी, डीएमसी ठाकूर व तावडे यांच्याकरीता १ लाख ५० हजार रू लाचेच्या रक्कमेची मागणी करून हि लाचेची रक्कम सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्विकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके हे पुढील तपास करीत आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवली मनपात लाचखोरीचे ग्रहण कधी सुटणार अशा चर्चा पलिका वर्तुळात यानिमित्ताने रंगल्या आहेत. तर अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा आयुक्त उगारणार का असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
Post a Comment
0 Comments