Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बाईक रॅलीद्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

वाहतूक नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,सोबतच दुचाकी चालवतं असताना हेल्मेट नेहमी परिधान करावे,कोणतीही नशा करून वाहन चालवू नये असे आवाहन कल्याण येथील एम १७ ह्या दुचाकी समूहाने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबई ते खोपोली सामाजिक संदेशाचे फलक हातात घेऊन दुचाकी रॅली काढली. एम १७ दुचाकी क्लब दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या दिवशी सामाजिक संदेशाचे फलक घेऊन समाजात वाहतूक नियम यांचे पालन करावे म्हणून दुचाकी रॅली काढत असते.  

यावर्षी ही देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विशेष दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  ह्यात विशेषतः लहानांपासून ते वयस्कर अश्या सर्वांनी सहभाग घेऊन वाहतूक नियम न पाळल्या मुळे होणारे अपघात ह्या बद्दल जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत दिनेश देवराज, अंकित शृंगारपुरे, विशाल सावंत, विनायक पाटील यांनी सहभाग नोंदविला. सकाळी ६ वाजता मुंबई येथून फ्लॅग ऑफ करून  हि रॅली सामाजिक आणि वाहतूक नियम पालन संदेशाचे नारे देत दुपार पर्यंत खोपोली येथे पूर्ण झाली

मागील ११ वर्षांपासून प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिन या दिवसांनिम्मित्ताने एम १७ क्लब हा दरवर्षी सामाजिक संदेश देणारे दुचाकी रॅली आयोजित करत आहे आणि पुढे ही असे च सामाजिक कार्य क्लब करत राहील असे एम १७ क्लब चे संस्थापक दिनेश देवराज ह्यांनी सांगितले. लवकरच एम १७ क्लब मार्फत मुंबई ते कन्याकुमारी अशी लांब पल्ल्याची दुचाकी राइड काढून देशात वाहतूक नियमांचे पालन व्हावे म्हणून शारीरिक चाचणी लागणारी भव्य मोहीम हातात घेणार आहे असे एम १७ समूहाचे सभासद भूषण पवार यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments