Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण परिसरात पोलिसांकडून विविध ठिकाणी धडक कारवाई

  

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण परिमंडळ-3 मध्ये नशेखोरांविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे. कल्याण परिमंडळ-3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळे मैदाने,निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असून, सोमवार रात्री विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या 34दुकानांवर कारवाई करण्यात आली . तसेच उघड्यावर व निर्जस्थळी बसून मद्यपी आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. आशा एकुण 83  कारवाई करण्यात आली आहे. 


तसेच रोडवरील अती वेगाने बेदरकारपणे मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे.वाहतुकीचे नियम  मोडून वाहने चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे अशा अनेक संदर्भात पोलिसांकडून कारवाई  करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे परंतु  नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून ही कारवाई कायमसुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments