Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भारतीय मराठा संघातर्फे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 


मस्साजोग येथील सरपंच हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी."

-भारतीय मराठा संघ ठाणे

                  ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

 मस्साजोग येथील सरपंच कैे संतोष देशमुख यांची निर्घूनपणे हत्त्या करणाऱ्या आरोपींना लवकरात अटक करून त्यांच्या विरोधात   जलदगती न्यायालयात खटला चालवीला जावा यासंदर्भात भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनानुसार दि.10 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

आपल्या शिवरायांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात राजरोसपणे असे हत्याकांड दिवसागणिक होत आहेत याची खंत व्यक्त करून त्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे सखोल व निपक्ष चौकशी होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी. यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी व निष्णांत वकिलाची नियुक्ती करण्यात यावी.  सदर प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी. सर्व  आरोपींना कठोरात कठोर शिक्षा (फाशी) होण्याची व्यवस्था करावी. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळा  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश पवार, सचिव  एस डी पाटील, उपाध्यक्ष दीपक पालांडे,उपाध्यक्षा अनघा जाधव, ठाणे/रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण फणसे, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा सचिव अनिल काकूळते,ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले, उपाध्यक्ष देवेंद्र पानकर, सचिव कृष्णा शिगवण, ठाणे शहर महिला अध्यक्षा उषा केंजळे, संघटक राकेश मोरे, मिलिंद भोसले, नारायण उतेकर आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments