Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाकुंभात भीषण आग


         अनेक सिलिंडर फुटले

       250 तंबू जळून खाक 

जखमी किंवा मृतांचा आकडा कळू शकला नाही 

              ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा 

रविवारी महाकुंभ (2025) जत्रा परिसरात भीषण आग लागली. सेक्टर 19 च्या शास्त्रीय पुलाखालील परिसरात ही आग लागली. अनेक जण दगावल्याचेही वृत्त आहे.


आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.

आग आटोक्यात आणण्यासाठी एनडीआरएफचे जवान पाण्याऐवजी वाळूचा वापर करत आहेत. त्याने सांगितले की ते आगीवर दाबाने ओतले जाते, जेणेकरून आग विझवता येईल. सुदैवाने या प्रचंड मोठ्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 16 येथील दिगंबर अनी आखाड्यात दुपारी 4 वाजता प्रसाद बनवला जात होता. यावेळी भीषण आग लागली. तंबूत ठेवलेले अनेक सिलिंडरही फुटले.   250 तंबू उद्ध्वस्त करण्यात आले.

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मोठी गर्दी असल्याने अग्निशमन दलाला पोहोचण्यास वेळ लागला. संपूर्ण महाकुंभमेळ्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व विभागातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात येत आहेत.

सीआरपीएफचे जवान आणि रूग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून, बचावकार्य देखील सुरू आहे.

लागलेली आग वेगाने सेक्टर २०च्या दिशेने पसरत आहे. याचा फटका गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पलाही बसलाय. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, एक पाठोपाठ एक १२ हून अधिक सिलिंडरचा स्फोट झालाय.

एकामागोमाग एक सिलिंडर फुटल्याने अग्निशमन दलाला मदत आणि बचाव कार्यात अडचण आल्या परंतु शेवटी  विझवण्यात यश आले.

आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळाल्याचं सांगण्यात आलं.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, यात कोणीही जखमी नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.


Post a Comment

0 Comments