आई आणि मुलगी यांच्यातील गुरू शिष्य परंपरेचे ऋणानुबंध
ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर
बदलापुरातील कथक नृत्य शिकवणारी संस्था,पदन्यास कथक इन्स्टिट्यूटचे हे दहावे वर्ष.या निमित्ताने जननी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीपीए मुंबई डान्स सीजन, आदर्श विद्यामंदिर आणि टाटा इन्व्हेस्टमेंट यांच्या सौजन्याने पदन्यास संस्थेने 19 जानेवारी रविवार संध्याकाळी 5 वाजता आदर्श विद्या मंदिर ऑडिटोरियम मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अभिजात शैलीमध्ये गुरु - शिष्य परंपरेला एक स्थान आहे. आई मुलगी तिच गुरु शिष्य असताना असे ऋणानुबंध नृत्यद्वारे कसे व्यक्त होतात याची प्रचिती आपल्याला या कार्यक्रमातून बघायला मिळेल. भरतनाट्यम डॉक्टर उमा रेळे आणि डॉक्टर वैदेही रेळे - लाल, भरतनृत्यम डॉक्टर जयश्री राजगोपालन आणि श्रीमती ऐश्वर्या हरीश, ओडिसी श्रीमती मिताली डिसोजा आणि दिया डिसूजा, कथक श्रीमती गायत्री भट आणि सुहानी भट सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे शास्त्रीय नृत्य शैलीचे वैविध्यही बघायला मिळेल. प्रवासाला लागणारा वेळ आणि गर्दी यामुळे रसिकजनांना आणि नृत्य अभ्यासकांना मुंबईला जाऊन कार्यक्रम बघणे शक्य होत नाही. आणि यासाठीच पदन्यास कथक इन्स्टिट्यूटने एनसीपीएच्या मुंबई डान्स सीजन द्वारे बदलापूर रसिकांसाठी ही नृत्य पर्वणी आयोजित केली आहे. प्रत्येकाने ह्या कार्यक्रमाचा आनंद जरूर घ्यावा.कारण सर्वांसाठी सदर कार्यक्रम विनामूल्य आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments