Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उचाट येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

साहित्य कला विचार मंच आणि उचाट शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन वाडा तालुक्यातील अस्पी विद्यालय उचाट येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ.श्रीकांत पाटील, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक ज्योतीताई ठाकरे, आयबीनएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, कवी अशोक पाटील, सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन, सुप्रसिद्ध कवी शारदासुत सुनील म्हसकर, उचाट शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रभाकर मोरे,प्रभाकर श्रीपतराव,अरविंद भोईर,डॉ किशोर डोहळे,माणिक पाटील,नरेश जोगमार्गे, बी. के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनात उचाट शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी दिवंगत यशवंत गोपाळराव मोरे स्मृती काव्यसंमेलनाची दोन सत्र घेण्यात आली. प्रथम सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान शहापूर येथील सुप्रसिद्ध कवी शारदासुत सुनील म्हसकर यांनी भूषविले. चारुशीला बहारे,महेंद्र पाटील,संजय गगे,संदीप पवार,वैशाली चौधरी,प्रियांका मोरे,अमृता संखे ,प्रा.ललित पाटील, निलेश गोतारणे,तुषार ठाकरे,लक्ष्मण पाटील,किशोरी पाटील,सुनीता महाजन,सुभाष नाईक,अमृता संखे,संदीप पाटील,जयेश मोरे आदी सुमारे चाळीस नामांकित कवींनी आपल्या सुंदर काव्यरचना सादर केल्या. यावेळी शारदासुत सुनील म्हसकर यांनी 'विठ्ठल, विठ्ठल अंतरंगी रंगे श्रीहरी चिंतन' ही भक्तिपर काव्यरचना आपल्या सुमधुर आवाजात गायन करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी निवडक कवींना सन्मानचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

साहित्य संमेलनाचे आयोजक विजय जोगमार्गे यांनी प्रास्ताविकातून साहित्य विचार मनामनात बिंबवण्यासाठी अशी संमेलने गावोगावी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

सूत्रसंचालन शुभम पाटील आणि विवेक शेळके यांनी केले तर योगेश गोतारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments