ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोटक एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत कल्याण पूर्वेतील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शनिवारी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक या तीनही विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एकदिवसीय सर्व समावेशक कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सर्व शिक्षकांचे व्यक्तिमत्व विकास साधणे, तसेच शालेय कामकाज सुरळीत व योग्य दिशेने चालावे यासाठी टीम वर्क कसे असावे व त्याचे परिणाम याचे प्रात्यक्षिक व उपक्रमांद्वारे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय यासंबंधी शिक्षकांकडूनच प्रॅक्टिकल करून घेण्यात आले. या कार्यशाळेसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे गणेश विद्यामंदिर शाळेसाठी असलेले फॅसिलिटेटर संदीप कुमार व त्यांचे सहकारी जान्हवी यांनी खूप मेहनत घेतली.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत नागरिक सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे तसेच चिटणीस दीपक पाटील, तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे उमा दाभोळकर, स्मिता मराठे, पुष्पांजली शेणवी तसेच ललिता मोरे, सुवर्णा भोईर, रघुनाथ कोळी यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हसत खेळत उत्साहात कार्यशाळा संपन्न झाली.
.jpg)




Post a Comment
0 Comments