Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै.चंद्रकांत भोईर यांनी साकारलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाचे होणार नुतनीकरण

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रथम स्थाई समिती सभापति कै. चंद्रकांत भोईर यांनी कल्याण (प ) येथे साकारलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाचे आता नुतनीकरण होण्याचे संकेत दिसायला लागले आहेत. रविवारी चौकात चर्मकार समाज बांधवांनी नूतनीकरणासाठी भव्य भूमिपूजन केले. 

ह्या वेळी आपले मत व्यक्त करताना कै.चंद्रकांत भोईर यांचे चिरंजीव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे  ) चे विधानसभा सह संघटक  रूपेश चंद्रकांत भोईर यांनी सांगितले की संत रोहिदास समाज मंडळाने अथक प्रयत्न करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिके कडून समाजिक उपक्रम निधीच्या माध्यमातून सदर चौकाचे नवीनीकरणा साठी खास प्रयत्न केले आणि आज आपण सुशोभिकरणा साठी इथे उपस्थित आहोत. रूपेश भोईर यांनी समाजाचे सर्व लोकांचे खास करून समाजाचे अध्यक्ष महेश भोईर आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ पत्रकार सुरळकर  यांचे आभार मानले. ह्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे परिवहन विभागाचे ठाणे जिल्हा प्रमुख निलेश भोर समवेत समाजसेवक विष्णु सातवे , नारायण वाळंज , पंढरीनाथ भोईर , विनोद गायकवाड, सागर जाधव , विकास रोकडे , गणेश वाळंज, सुनील वाळंज, नीतिन भोईर , अभिषेक निंबाळकर, सागर मनियार , अश्विन सातवे , योगेश रोकडे व कल्पेश रोकडे व   चर्मकार समाजाचे लोक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments