- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
- अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
- =====================================
ब्लॅक अँड व्हाईट नागपूर वृत्तसेवा
अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले.
अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे
- भाजपकडे असणारी खाती
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
- राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
- गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
- गणेश नाईक - वनमंत्री
- मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
- जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
- पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
- अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
- मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
- माधुरी मिसाळ - शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय
- आकाश फुंडकर - कामगार
- जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज
- शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक उपक्रम
- आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान
- नितेश राणे -
- नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
- अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7.गणेश नाईक - वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे - कृषी
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - कापड
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक - वाहतूक
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर - कामगार
32.बाबासाहेब पाटील - सहकार
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण,
15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 व्या दिवशी 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या 42 झाली आहे. मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना त्यात स्थान मिळाले नाही. यामध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 5 आहेत. 19 नवीन मंत्री झाले. यामध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत. याशिवाय 4 महिला (3 भाजप, 1 राष्ट्रवादी) आणि 1 मुस्लिम (राष्ट्रवादी) यांना सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात तरुण मंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (36) आहेत, तर सर्वात वयस्कर मंत्री भाजपचे गणेश नाईक (74) आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments