Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भिवंडी बनलंय बांगलादेशींचं माहेरघर

 

 सरकारी यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याने घुसखोरांची संख्या वाढतच आहे......

मुस्लिमबहुल भिवंडीत आश्रय घेणे सोपे होत असल्याने मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी येथे तळ ठोकला आहे. अवैधरित्या बिनदिक्कत येथे वास्तव्यास असलेल्या या बांगलादेशी घुसखोरांना शोधून ताब्यात घेण्याची मोहीम भिवंडी पोलिसांनी हाती घेतली आहे

या मोहिमेंतर्गत मागील २५ दिवसांत तब्बल २३ बांगलादेशींना अटक केली आहे. काही हजार रुपयांमध्ये भारतात घुसखोरी करून हे बांगलादेशी मजुरीसह देहविक्री व्यापारात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.

               ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवरील होणारे अन्याय, अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. त्यातच भिवंडीत अवैधपणे घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. झोपडपट्टी भागात ही संख्या सर्वाधिक आहे. इतकी वर्षे झोपेचे सोंग सरकारी यंत्रणेने घेतल्याने घुसखोरांची संख्या वाढतच आहे

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात बांगलादेशी घुसखोराविरोधात मोहीम तीव्र झाली आहे. त्यानंतर भिवंडी पोलिसही खडबडून जागे झाले आहेत. या मोहिमेंतर्गत नुकतेच हनुमान टेकडी या देहविक्री व्यापार करणाऱ्या महिलांच्या वस्तीतून रोझी होवी गायन (३३), बेगम आसमा मोसम्मद (४३), रशिदा हनीफ खलिफा (४०) यांना भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे,

तर रविवारी पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कामतघर हनुमान नगर येथून शाहीद अब्दुल कलाम अन्सारी या बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. या दोन्ही गुन्ह्यात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. अशाप्रकारे भिवंडी पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे.

दलालांच्या मदतीने घुसखोरी

आर्थिक टंचाई, अशिक्षितपणा व प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून भारतात गैरमार्गाने घुसखोरी करत आहेत. भारतात प्रवेश करण्यासाठी या नागरिकांनी पारपत्र व परवाना, तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे;

मात्र या सर्व शासकीय नियमांना बगल देत केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात आणि याच दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिमबहुल भागांसह दाटीवाटी असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्येदेखील राहतात.

एक वर्षापर्यंत तुरुंगात

शहरात अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. अवजड काम, तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी, डाइंग सायजिंगमध्ये बॉयलर अटेंडंट व प्लंबिंगचे काम करून भिवंडीतील अनेक ठिकाणी चाळींमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात.

बहुसंख्य बांगलादेशी हे मजुरी व प्लम्बिंगच्या कामासाठी, तर महिला या देहविक्री व्यापार करणाऱ्या वस्तीत प्रामुख्याने आढळून आल्या आहेत. कायदेशीर नियमानुसार अटक केलेल्या या बांगलादेशी नागरिकांना दोन ते तीन महिने, तर कधी कधी न्यायालयीन प्रक्रिया व पोलिस तपासात लागणाऱ्या विलंबामुळे एक वर्षापर्यंत तुरुंगात ठेवले जाते. त्यांनतर प. बंगाल येथील भारत व बांगलादेशच्या बॉर्डरवरून त्यांच्या देशात सोडून देतात 

१५ हजारांत भारतीय ओळखपत्र

भिवंडीत अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला पाच ते सात हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल त्यांना भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस शासकीय कागदपत्रे तयार करून देतात, तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तरुणींकडून १० ते १५ हजार हे दलाल घेतात.

मोहीम अधिक तीव्र करणार

भिवंडीत राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येते. डिसेंबरमध्ये २३ जणांवर कारवाई झाली आहे. यापूर्वीही १३ जण ताब्यात घेतले होते. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आता अटक केलेले बांगलादेशी घुसखोर देशविघातक कृत्याशी संबंधित आहेत किंवा नाही याचाही तपास पोलिस यंत्रणा करीत असल्याची माहिती भिवंडी पोलिस उपायुक्त मोहन दहिकर यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments