ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर : कल्याणच्या पारनाका परिसरात भाजपचे जुने कार्यकर्ते हेमंत परांजपे यांना अज्ञात आरोपींकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भाजपचे कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वात शहर कार्यालय येथे या घटनेचा निषेध करण्यात आला.
हा हल्ला परांजपेंवर नसून भाजपवर आहे. आरोपींनी तोंडावर रुमाल बांधून मारहाण केली तुमच्यात दम असेल तर आव्हान द्या आणि समोरासमोर येऊन लढा अशी संतप्त प्रतिक्रिया शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे. पोलिसांनी 12तासाच्या आत या घटनेतील आरोपींना अटक करावे अशी मागणी देखील करण्यात आली.
.jpg)

Post a Comment
0 Comments