Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेतील विकास कामांकरिता आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण पूर्वेतील विकास कामांकरिता आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी घेतली आयुक्तांची भेट

ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर: नवनिर्वाचित आमदार माननीय आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाखड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कल्याण पूर्वेतील लोकोपयोगी विविध विकास कामे तसेच काही शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा करून ही विकासकामे तातडीने मार्गी लाऊन सामान्यजनतेला लवकरात लवकर योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या असे निवेदन देण्यात आले. माननीय आयुक्त इंदुराणी जाखड यांच्याकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. 

या निवेदन पत्रातील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे :-

• कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या बायोमेट्रीक सर्व्हेची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी तसेच कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या काम जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करावे व नागरिकांचे पुनर्वसन करावे.

• कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत रुग्णालया करिता (आरक्षण क्र. २८३) आरक्षित असलेली ३०,००० चौ.मी. जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करून या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाकडे सादर करण्याबाबत.

• कल्याण  पूर्वेतील मराठा कोळशेवाडी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक होणे बाबत...

• कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण व त्या समोरील राजर्षी शाहू उद्यान हे एकत्र करून युटाईप रस्ता रुंदीकरण करतांना गणपती मंदिर चौक मराठा कोळशेवाडी ते सिद्धार्थनगर स्काय वॉक समांतर रस्ता तयार करणे बाबत.

• कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर व पाणी बिलाची  थकबाकी असणाऱ्या करदात्यावर आकारण्यात येणारे दंड/व्याज १००% माफ करण्यासाठी अभय योजना सुरु करणे बाबत...

• कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत क्रीडासंकुल आरक्षण क्र. २७९ आरक्षित जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया नगररचना विभागाच्या दिरंगाईमुळे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सदरची जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने सुरु करणे तसेच क्रीडासंकुल उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा डी.पी.आर. त्वरित राज्य शासनाकडे सादर करणेबाबत...

• कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तसेच अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकणे व जलकुंभ बनविण्याच्याचे संथ गतीने सुरु असल्याबाबत.

• चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार या नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात पथदिवे बसविणे.

• RDSS योजने अंतर्गत प्रस्तावित उपकेंद्र महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीला २२/११ के.व्ही. उपकेंद्रासाठी ३००० चौ.मी. जागा उपलब्ध करून देणे.

• कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.१०० तिसगाव गावठाण, सर्व्हे नं.८६ आरक्षण क्र.४४३ येथे जलकुंभ तातडीने बनविणे.

• नवी मुंबई महानगरपालिका व  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याधर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील ५०० चौरसफुटापर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्याबाबत.

•गेल्या पाच वर्षांपासून (R&B) आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदारा मार्फत कल्याण पूर्वेतील “४-जे” प्रभाग क्षेत्र अंतर्गत घनकचरा विभागात कार्यरत ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्याबाबत.

•कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य त्या उपयायोजना करण्याबाबत तसेच पाणी समस्या संपुष्टात येईपर्यत दररोज टॅकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्याबाबत...

Post a Comment

0 Comments