Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

20व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे 10 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजन

 20व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे   10 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजन 

                          ब्लॅक अँड व्हाईट 

(कल्याण) वार्ताहर : सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र उरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून "अखिल भारतीय आगरी महोत्सव" या समाज सोहळ्याचा आयोजनात सुरुवात केलेली आहे. कल्याण डॉचिवलीकरच नाही तर ठाणे, रायगड, मुंबईवासियसु‌द्धा आगरी महोत्सवची चालकासारखी वाट पाहत असतात. असा 20वा अखिल भारतीय आगरी महोत्सव यंदा 10 ते 17 डिसेंबर  या कालावधीत श्रीसंत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवाचा उ‌द्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी 10 डिसेंबर  रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने असल्याने सर्व लोकप्रतिनिधी हे महोत्सव कालावधीमध्ये आगरी महोत्सव ला शुभेच्छा भेट देणार आहेत.

अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे "एक आनंदाची पर्वणी" या आनंदाच्या पर्वणी मध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महोत्सव मध्ये भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंत वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीत नृत्य प्रेमींना आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खा‌द्यपदार्थावर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशा एवढा आनंद घेता यावा, त्यांच्या आनंदामध्ये बाधा येऊ नये म्हणून महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

 

Post a Comment

0 Comments