Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

व्होट जिहाद'च्या विरोधात साधू-महंत उतरले मैदानात,

 'व्होट जिहाद'च्या विरोधात साधू-महंत उतरले मैदानात 

नोमानींच्या व्हिडीओला दिले चोख प्रत्युत्तर

                           ब्लॅक अँड व्हाईट 

(मुंबई)वार्ताहर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार थोफा थंडावल्या आहेत. पण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारला मतदान करण्यासाठी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही हा व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर आता नोमानी यांच्या व्हिडीओवर साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र्य अधिकार आहे. देशामध्ये अनेक समस्या आहे, अडचणी आहे, त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. पण असा प्रकार खपवून घेणार नाही" असं म्हणत मैदानात उतरले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकीकडे प्रचार सभाचा धडाका सुरू असताना ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नोमानी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले यांना पाठिंबा दिला. हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है, असं म्हणणारा सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

नोमानी यांच्या या व्हिडिओवर आशिष शेलारांनी सडकून टीका केली आहे. तसंच आशिष शेलारांकडून एक है तो सेफ है चा पुनरुच्चार करण्यात आला. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर सभेत नोमानी यांचा व्हिडीओ ऐकवला होता. जर व्होट जिहाद होत असेल तर आम्हाला मतांसाठी धर्मयुद्ध करावं लागेल, अशी गर्जनाच केली होती.

दरम्यान, साधू-संत यांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत एक है तो सेफ हैचा नारा दिला आहे. आमच्या इथं व्होट हे तो जिहादचा विरोध झाला पाहिजे. कारण काय आहे की, हिंदूंनी फक्त मतदान करून भागणार नाही. सनातन धर्मामध्ये आपली भूमिका मांडणे गरजेचं आहे. ज्या प्रकारे मुस्लिम समाज एका पक्षासाठी एकत्र येत आहे. त्या प्रकारे आपणही एकत्र आलं पाहिजे. आमचा सनातन धर्मचा जो उद्धार करेल, समाजाला पुढे करेल, अशा पक्षाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. जो पक्ष देशाच्या हितासाठी काम करेल, अशा पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे. यासाठी आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन लोकांना समजावून सांगू आणि आपण मतदान करणारं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया साध्वी गीतांबा तीर्थ यांनी दिली.

तर हनुमानगढीचे महंत राजू दास म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे व्होट जिहाद चालवलं जात आहे. मुस्लिम समाजाला भडकावण्याचं काम केलं जात आहे. मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंकडून अपिल केलं जात आहे. हिंदुत्वावादी विचारधारा असलेल्या उमेदवारांचा पराभव झाला पाहिजे. त्यामुळे हिंदू साधू-संतांना सुद्धा अपिल करावं लागत आहे की सनातन धर्मासाठी हिंदू धर्माने पाठिंबा द्यावा'

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत दुर्गादास यांनी व्होट जिहाद प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. "मौलाना यांनी मतांसाठी अशा प्रकारे आवाहन करत असेल तर देशाविरोधात कृत्य आहे. तुम्ही जर एखाद्या पक्षाला मतदान केलं नाही तर त्यांचं अन्न-पाणी बंद करू शकत नाही. मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र्य अधिकार आहे. देशामध्ये अनेक समस्या आहे, अडचणी आहे, त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. पण एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करणे हे चुकीचं आहे. संत आखाडा अशा प्रकाराचा निषेध करत आहे. लोकांना आम्ही आवाहन करतोय की अशा आवाहनाला बळी पडू नका, मतदान करण्याचा तुमचा अधिकार आहे. तो प्रत्येकांनी बजावला पाहिजे."




Post a Comment

0 Comments