कल्याण ग्रामीण मध्ये महायुतीचाच आमदार हवा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या
प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
ब्लॅक अँड व्हाईट
कल्याण वार्ताहर : कल्याण ग्रामीण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांनी लोकसभा निवडणुकीत विश्वास दाखवला आणि श्रीकांतने त्याचे सोने केले. त्याने आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आता इथे आमदारही आपलाच हवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील समर्थ नगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
"जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले त्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार ? मला तुमचे आयुष्य सोन्यासारखे करायचे आहे. राज्य प्रगती कडे न्यायचे आहे आजवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचा निधी आणून गल्ली गल्लीत विकास पोहोचवला आहे." कल्याण ग्रामीणच्या चौफेर विकासासाठी राजेश मोरे यांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपण राजेश मोरे यांच्या रूपाने सर्वांच्या सुखदुःखात जाऊन जाणारा उमेदवार दिला आहे. इथे जरी तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात मला फक्त इथे विकासाचा भगवा रंग दिसत आहे आणि हाच रंग निकाला दिवशी दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका मागच्या सारख्या चुका करू नका असा प्रेमात सल्लाही त्यांनी दिला. लाडक्या बहिणींना खात्यात पैसे मिळणारच, लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आला तर त्याची गय केली जाणार नाही. लाडक्या बहिणी योजनेसाठी 33 कोटींची तरतूद केली आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उमेदवार राजेश मोरे यांच्या कार्य अहवाल आणि वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
.jpg)


Post a Comment
0 Comments