Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे तर्फे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनील म्हसकर यांची निवड

 राज्य शैक्षणिक संशोधन समितीवर  तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनील म्हसकर यांची नियुक्ती

                   ब्लॅक अँड व्हाईट (विशेष)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे तर्फे शालेय शिक्षण स्तरावर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती अभ्यासगट विकसन विभाग समितीवर सुनील म्हसकर सर यांची मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्यातून निवड करण्यात आलेली असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. 

सुनील म्हसकर सर हे शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संचलित सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय, आमणे ता. भिवंडी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड व डी.एड असे असून एज्युकेशन व मराठी या दोन विषयात ते सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. सध्या ते 'एज्युकेशन'  या विषयात मुंबई विद्यापीठातून सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय उल्हानगर केंद्रातून डॉ. हिना वाधवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करत आहेत.

सुनील म्हसकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर या पुरस्काराने सन्मानित असून त्यांस भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र ठाणे मार्फत जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडून ठाणे जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ते एक उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते नेहमी झोकून काम करत असतात. तसेच ते एक हाडाचे शिक्षक व निष्काम सेवाव्रती असून शिक्षणक्षेत्रात त्यांचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्यांची प्रज्ञावंत साहित्यिक म्हणूनही विशेष ओळख असून ते शारदासुत या टोपणनावाने साहित्य लेखन करतात.  त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक व साहित्यिक कार्याची विशेष ख्याती असून आजतागायत त्यांस दोनशेहून अधिक सन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 

 “सर्वप्रथम मला ही सुवर्णसंधी देऊ केली त्याबाबत मी माननीय संचालक, SCERT पुणे यांचे आणि शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर, ता.भिवंडी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजू पाटील साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच माननीय संचालक जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (DIET) ठाणे, मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ठाणे, मा.गटशिक्षाधिकारी, भिवंडी आणि सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय, आमणे ता. भिवंडी यांचेही मी विशेष आभार मानतो. मी घेतलेल्या उच्च शिक्षणाची दखल शासनाने घेतल्याने आज मला अत्यंत आनंद झाला आहे. मला दिलेली जबाबदारी  अधिक उत्तम प्रकारे पार पाडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.” असे सुनील म्हसकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सुनील म्हसकर यांची SCERT पुणे तर्फे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments