Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तावडेंच्या राजकीय कारकिर्दीचा भयंकर 'विनोद'

तावडेंच्या राजकीय कारकिर्दीचा भयंकर  'विनोद'

राजकीय डावपेचाच्या            "तावडीत" सापडले तावडे

            

 ब्लॅक अँड व्हाईट(मुंबई) वार्ताहर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे  यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून  करण्यात आला.यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे  यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

विनोद तावडे नालासोपाऱ्यात विवांत हॉटेलमध्ये त्यांचे उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी आले होते. दोन्ही नेते हॉटेलमध्ये बसलेले असतानाच अचानक बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह विवांत हॉटेलमध्ये आले. विनोद तावडे पैसे वाटपासाठी बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. यावेळी क्षितीज ठाकूर यांनी पैशांचं बंडल देखील माध्यमांना दाखवले.

विनोद तावडेंची प्रतिक्रिया

या प्रकरणावर विनोद तावडे म्हणाले की, आज नालासोपारामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. यावेळी आमचे विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला की मी पैसे वाटत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नक्कीच चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही चेक करावे, त्यातून सत्य बाहेर येईल. मी 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षात आहेत. हितेंद्र ठाकूर मला चांगले ओळखतात. सत्य सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ज्या पैशांवरून राडा केला ते माझे नाहीतच. ज्या खोल्यांत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो, असे तावडे यांनी म्हटले आहे. याचबरोबर जेवढा त्यांनी दावा केला आहे तेवढे पैसे सापडले नाहीत तर मी ते ठाकुरांकडून वसूल करणार आहे, असेही तावडे यांनी म्हटले आहे.

आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले.

बविआ हा भाजपाचा मित्रपक्ष आहे. इथे सर्व्हे शून्य आहे, असे भाजपाला माहिती आहे. मला भाजपाच्याच नेत्याचा फोन आला की तावडे ५ कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी येत आहेत. मी त्यांना म्हटले एवढा मोठा नेता असे करणार नाही. परंतू, तावडे आले, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. या मिटींगला २०० लोक जमले होते, त्याना त्या पैशांचे वाटप झाले असेल आणि ते निघून गेले असतील असे ठाकूर म्हणाले. पत्रकार परिषदेनंतर तावडे आणि ठाकूर हे दोघेही एकाच कारमधून निघून गेले. यामुळे या प्रकरणावर एकंदरीतच जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments