कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिन संपन्न
ब्लॅक अँड व्हाईट
(कल्याण) वार्ताहर : भारतीय संविधान दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यानंतर 26/11/2008 रोजी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व दहशतवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आले. महापालिका क्षेत्रातील विविध शाळा व महाविद्यालयांतही संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच प्रभाग स्तरावर सहा. आयुक्त आणि कर्मचाऱ्यांनी देखील संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments