कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी केले सहकुटुंब मतदान
ब्लॅक अँड व्हाईट
कल्याण वार्ताहर : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सकाळीच बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सह कुटुंब मतदानाचा हक्क बजावला. डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मराठी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आज आपण अतिशय भावूक आणि आनंदी असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विधानसभेतून आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देत आपला सन्मान केला याचा आनंद आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून चाललेले हे महायुतीचे सरकार पुन्हा यावे आणि त्यांनी पुन्हा एकदा जनसेवा करावी अशी सर्व नागरिकांची भावना आहे. म्हणूनच सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने नागरिकांना दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे आणि हा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे. मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले तुम्हीही करा असे या निमित्ताने सर्व मतदारांना त्यांनी आवाहन केले.
.jpg)

Post a Comment
0 Comments