Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना मनसेची उमेदवारी

 कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना मनसेची उमेदवारी

राज ठाकरे यांच्या हस्ते राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन 

              ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण  वार्ताहर 

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची उमेदवारी यादी अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदार संघात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.  कल्याण शिळ रोडवर मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, माजी आमदार रतन पाटील,  उपाध्यक्ष सचिन कदम, अभिजित पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,   जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख विनोद पाटील, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, मनोज घरत, सुदेश चूडनाईक,  योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी आणि प्रभू श्री रामांची भव्य अशी प्रतिमा भेट दिली. यांवर राज ठाकरे यांनी  आधीचं  घर छोटं पडत होत म्हणून मोठं घर घेतलं. अशा मोठ्या  भेटवस्तू आल्यातर आणखी मोठं घर घ्यावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी केली. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

तर उमेदवारी यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल. त्याआधीच कल्याण ग्रामीणसाठी राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदार संघासाठी अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच  येत्या 24 तारखेला अविनाश जाधव  आणि राजू पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी येणार असून तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी यावं असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.




दरम्यान राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यांसाठी जातात तिकडच्या उमेदवारी जाहीर करत असून तशाच कल्याण ग्रामीण आणि ठाण्याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही निवडणूक लढण्यासाठी मुद्दे भरपूर आहेत, मुद्दे आणि गुद्दे सोबत घेऊनच निवडणूक लढणार आहे. पाच वर्षात तीन मुख्यमंत्री, दोन तीन राज्यपाल पाहिले आहेत. कोविड मध्ये सुरू असलेलं राजकारण  या गोष्टी लोकं विसरलेले नाहीत. त्यामुळे उडालेला बोजवारा, बिघडलेली राजकीय संस्कृती हे सर्व लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी  सांगितले.

Post a Comment

0 Comments