कल्याण तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार,भातशेती धोक्यात..
हातात तोंडाशी आलेला घास हिरावला..!
बळीराजा चिंतातुर,
पिक नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी..!
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण उमेश जाधव
कल्याण -: कल्याण तालुक्यात परतीचा पाऊस व चक्रीवादळाने तीश-चार दिवसांपासून जोरदार हाहाकार सुरु केल्याने अक्षरशः भातशेती पाण्याखाली गेल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ प्रशासनाकडून भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अशोक भोईर यांनी केली आहे.
यंदा कल्याण तालुक्यात भाताचे पीक भरघोस आले आहे. परंतु गेली तीन चाच दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या वादळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर भात शेतीतील उभी पिके आडवी झाली आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज न बघताच भातकापणीला सुरुवात केली होती. परंतु पाऊस काही थांबेना यामुळे शनिवारी व रविवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गाची चांगली त्रेधातिरपीट उडाली असून, शेतातील उभी पिके आडवी झाली असून कापलेल्या भाताचे पीक पाण्यावर तरंगत आहे. यामुळे शेतकरी राजा कमालीचा चिंतातुर झाला आहे. प्रशासनाने तातडीने भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
या परतीच्या वादळी वाऱ्यासह तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे भातशेती बरोबरच घरांचे पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडते, वीज पुरवठा खंडित होणे. अशा अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना गेली तीन-चार दिवसांपासून सामोरे जावे लागत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments